घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आत्ताचा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वच वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध बातम्यांनुसार Pune आणि Pimpri-Chinchwad परिसरात रेडीरेकनर दरात सरासरी ८ ते १० टक्क्यांपर्यंत वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे, तर ग्रामीण भागात ५ ते ७ टक्के वाढ अपेक्षित आहे. याबाबत अंतिम निर्णय राज्य शासनाकडून घेतला जाणार आहे. व तो १ एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्षांत लागू केला जाणार आहे.
ही वाढ लागू झाल्यास घरांच्या किमतींमध्येही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घर खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांनी तातडीने निर्णय घेतल्यास सध्याचा काळ फायदेशीर ठरू शकतो.
रेडीरेकनर दर म्हणजे काय?
रेडीरेकनर दर म्हणजे सरकारकडून ठरवलेली जमिनी किंवा मालमत्तेची किमान किंमत होय. या दरावर आधारित मालमत्तेची नोंदणी आणि स्टॅम्प ड्युटी ठरवली जाते. त्यामुळे रेडीरेकनर दर वाढले तर मालमत्तेच्या व्यवहाराची एकूण किंमतही वाढते.
पुणे जिल्ह्यात वाढीचा प्रस्ताव
बातम्यांमध्ये प्रसिद्ध माहितीनुसार Pune आणि Pimpri-Chinchwad परिसरात रेडीरेकनर दरात ८ ते १० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात ५ ते ७ टक्के वाढ प्रस्तावित आहे. याबाबत अंतिम निर्णय राज्य शासनाकडून घेतला जाणार आहे. व तो १ एप्रिल रोजी नवीन आर्थिक वर्षांत लागू केला जाणार आहे.
घर खरेदीसाठी उत्तम संधी
जर तुम्ही पुणे जिल्ह्यात घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्याचा काळ योग्य ठरू शकतो. विशेषतः परवडणाऱ्या घरांसाठी Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA) चे प्रकल्प हा एक उत्तम पर्याय मानला जातो.
रेडीरेकनर दरात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हा योग्य काळ मानला जात आहे. या कारणामुळे लवकरात लवकर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट खूप चांगले मिळू शकतात. त्यामुळे योग्य प्रकल्पात गुंतवणूक केल्यास भविष्यात त्याचा चांगला फायदा होऊ शकतो
MHADA प्रकल्प – विश्वास आणि परवडणारी घरे
MHADA द्वारे पुणे जिल्ह्यात अनेक गृहप्रकल्प विकसित केले जात आहेत. त्यापैकी काही प्रकल्पांना नागरिकांकडून लक्षणीय प्रतिसाद मिळतो आहे. विशेष म्हणजे ही घरे म्हाडा लॉटरी प्रक्रियेतील नसून ती प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावरील म्हाडा प्रकल्पातील घरे आहेत.
MHADA Mahalunge Chakan
Mahalunge Chakan येथील MHADA प्रकल्प हा पुणे जिल्ह्यातील वेगाने विकसित होत असलेल्या भागांपैकी एक आहे. चाकण औद्योगिक क्षेत्राजवळ असल्यामुळे येथे रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
उत्तम रस्ते जोडणी आणि वाढणारी पायाभूत सुविधा यामुळे हा परिसर घर खरेदीसाठी आकर्षक ठरत आहे. परवडणाऱ्या किमतीत घर घेण्याची संधी येथे उपलब्ध असून भविष्यातील विकास लक्षात घेता हा प्रकल्प गुंतवणुकीसाठीही फायदेशीर ठरू शकतो.
MHADA Rakshewadi
Rakshewadi परिसरात विकसित होत असलेला MHADA गृहप्रकल्प परवडणारी आणि सुरक्षित घरे उपलब्ध करून देतो. शांत वातावरण आणि वाढती पायाभूत सुविधा यामुळे हा भाग कुटुंबासोबत राहण्यासाठी योग्य ठरत आहे.
पुणे आणि चाकण परिसराशी चांगली कनेक्टिव्हिटी असल्यामुळे येथील रहिवाशांना प्रवास करणे सोपे जाते. भविष्यात या भागाचा वेगाने विकास होण्याची शक्यता असल्यामुळे येथे घर घेणे हा एक चांगला निर्णय ठरू शकतो.
MHADA Shirur
Shirur येथे MHADA चा गृहप्रकल्प परवडणाऱ्या दरात घर घेण्याची उत्तम संधी देतो. शांत आणि स्वच्छ वातावरणामुळे हा परिसर राहण्यासाठी अत्यंत योग्य आहे.
शिरूर शहरात शिक्षण, बाजारपेठ आणि इतर आवश्यक सुविधा सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे कुटुंबासाठी सुरक्षित आणि आरामदायी जीवनशैली येथे मिळू शकते. भविष्यातील विकासामुळे येथे गुंतवणूक करण्याचीही चांगली संधी आहे.
निष्कर्ष
रेडीरेकनर दरात संभाव्य वाढ लक्षात घेता घर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा योग्य काळ ठरू शकतो. विशेषतः परवडणाऱ्या दरात आणि विश्वासार्ह प्रकल्पांमध्ये घर मिळवण्यासाठी MHADA चे प्रकल्प उत्तम पर्याय ठरतात.
MHADA Mahalunge Chakan, MHADA Rakshewadi आणि MHADA Shirur या प्रकल्पांमुळे अनेक कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.
३१ मार्च च्या आधी तुम्ही जर प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो. त्यामुळे योग्य संधीचा फायदा घेऊन आजच अधिक माहिती मिळवा आणि आपल्या स्वप्नातील घरासाठी पहिले पाऊल टाका.
Source: Prabhat Newspaper

Comments
Post a Comment